धुळे लोकसभेसाठी ४८.८१ टक्के मतदान

धुळे, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (दि.२०) सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सांयकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४८.८१ टक्के मतदान झाले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे : धुळे ग्रामीण- ५०.३१ टक्के धुळे शहर- ४६.१६ टक्के शिंदखेडा – …

धुळे लोकसभेसाठी ४८.८१ टक्के मतदान

धुळे, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (दि.२०) सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ विधानसभा मतदारसंघात सांयकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे ग्रामीण- ५०.३१ टक्के
धुळे शहर- ४६.१६ टक्के
शिंदखेडा – ४५.८४ टक्के
मालेगांव मध्य- ५७.०२ टक्के
मालेगांव बाहृय- ४७.०० टक्के
बागलाण- ४७.०१ टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. सायंकाळी ६.०० वाजता जे मतदार मतदानासाठी रांगेत उभे असतील, त्यांना मतदान करु दिले जाणार आहे. या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राचे कामकाज सुरू राहील, असे निवडणूक आयोगामार्फत सांगण्यात आले.
हेही वाचा :

Dhule Lok Sabha Live Update : धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.92 टक्के मतदान
ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.०५ टक्‍के मतदान
लोकसभा निवडणूक 2024 : वेळेच्या काट्याबरोबर उमेदवारांची धडधडही वाढली..!