मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून फुटेज हरवल्याची खोटी माहिती: ‘आप’चा आरोप 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  स्वाती मालीवाल प्रकरणी (Swati Maliwal assault case) दिल्ली पोलिस सीसीटीव्ही फुटेज हरवल्याची खोटी माहिती पसरवत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने रविवारी (१९ मे) केला. या प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. आम आदमी पक्ष सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. तर याप्रकरणी दिल्ली पोलिस भाजपच्या सूचनेनुसार …
मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून फुटेज हरवल्याची खोटी माहिती: ‘आप’चा आरोप 

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा:  स्वाती मालीवाल प्रकरणी (Swati Maliwal assault case) दिल्ली पोलिस सीसीटीव्ही फुटेज हरवल्याची खोटी माहिती पसरवत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने रविवारी (१९ मे) केला. या प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. आम आदमी पक्ष सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला. तर याप्रकरणी दिल्ली पोलिस भाजपच्या सूचनेनुसार काम करत आहे, असा पलटवार ‘आप’ने केला.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामध्ये (Swati Maliwal assault case) सीसीटीव्ही फुटेज गहाळ झाल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला. त्यानंतर आम आदमी पक्षाने यावर पलटवार केला आहे. दिल्ली पोलिसांचा हा आरोप खोटा असल्याचा दावा आपचे नेते सौरव भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. “दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या खाजगी भागासह विविध भागाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.” अशी माहिती यावेळी भारद्वाज यांनी दिली.

स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये विभव कुमार यांना वाचवण्यासाठी आम आदमी पक्ष सीसीटीव्ही फूटेजमध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. यावरही सौरव भारद्वाज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “माझा विश्वास आहे की तपास यंत्रणा निःपक्षपाती असली पाहिजे. दिल्ली पोलिस ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासून खोट्या बातम्या पसरवत आहे. त्यावरुन समजते की दिल्ली पोलिस भाजपच्या सांगण्यावरून काम करत आहे, असा गंभीर आरोपही भारद्वाज यांनी पोलिसांवर केला आणि आम्ही सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड केली नाही,” असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Swati Maliwal : स्वाती मालीवाल प्रकरणी केजरीवाल गप्प का? : भाजपचा सवाल
Swati Maliwal assault case | स्वाती मालीवाल प्रकरण: केजरीवालांच्या घरातील CCTV, डीव्हीआर जप्त
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचे षडयंत्र : ‘आप’ नेत्‍या अतिशी