हैदराबादची दुसऱ्या स्थानी झेप; पंजाबविरूद्ध चार गडी राखून विजय

हैदराबादची दुसऱ्या स्थानी झेप; पंजाबविरूद्ध चार गडी राखून विजय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 च्या 69 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा चार विकेट्सने पराभव केला. प्रभसिमरनने केलेल्या शानदार 71 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने हैदराबादला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना करताना हैदराबादने हे आव्हान 4 विकेट राखून पार केले. यामध्ये हैदराबादच्या अभिषेक शर्माने महत्वाची खेळी केली. सामन्यातील विजयासह हैदराबादने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत प्ले ऑफचे तिकीट कन्फर्म केले आहे. (IPL 2024)
आज आयपीएल 2024 चा शेवटचा डबल हेडर आहे. यानंतर मंगळवारपासून प्लेऑफला सुरुवात होईल. दुसऱ्या स्थानासाठीच्या लढाईत सनरायझर्सने आपला सामना जिंकला आहे. आता त्यांना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजच्या दुसऱ्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर कोलकाता संघ हरला किंवा हा सामना पावसाने वाहून गेला, तर सनरायझर्स संघ साखळी फेरीत दुसरे स्थान मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी राजस्थानचा संघ कोलकात्याला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर कोलकाता पहिला आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफमध्ये पोहोचेल. अशा स्थितीत सनरायझर्सला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल. प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. सनरायझर्सने 14 सामन्यांत आठ विजय आणि पाच पराभवांसह साखळी फेरी पूर्ण केली. एक सामना पावसाने वाहून गेला. संघाने एकूण 17 गुण मिळवले. त्याचबरोबर कोलकाताचे सध्या 19 गुण आहेत आणि राजस्थानचे सध्या 16 गुण आहेत. आरसीबीचे १४ गुण आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पाच गडी गमावून २१४ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 45 चेंडूत 71 धावा, रिले रुसोने 24 चेंडूत 49 धावा आणि अथर्व तायडेने 27 चेंडूत 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात अभिषेक शर्माच्या २८ चेंडूंत ६६ धावा आणि हेनरिक क्लासेनच्या २६ चेंडूंत ४२ धावांच्या जोरावर हैदराबादने १९.१ षटकांत २१५ धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने 45 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. परंतु, शानदार खेळी करणाऱ्या अथर्व तायडे आणि रिले रुसो यांची अर्धशतके हुकली. अथर्व २७ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला तर, रुसो २४ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला. कर्णधार जितेश शर्माने १५ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. पंजाबने 20 व्या षटकात 19 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक दोन बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि विजयकांत व्यासकांत यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.