स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचे षडयंत्र : ‘आप’ नेत्‍या अतिशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आम आदमी पार्टीने पुन्‍हा एकदा भाजपवर हल्‍लाबाेल केला आहे. याबाबत आपच्‍या नेत्‍या आणि दिल्‍लीच्‍या मंत्री अतिशी यांनी हे सर्व भाजपचे षडयंत्र असल्‍याचे म्‍हटलं आहे. ( Swati Maliwal case) काय म्हणाल्या आतिशी?  स्वाती मालीवाल मारहाण घटना म्हणजे भाजपने रचलेले षडयंत्र दिल्ली …
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचे षडयंत्र : ‘आप’ नेत्‍या अतिशी


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आम आदमी पार्टीने पुन्‍हा एकदा भाजपवर हल्‍लाबाेल केला आहे. याबाबत आपच्‍या नेत्‍या आणि दिल्‍लीच्‍या मंत्री अतिशी यांनी हे सर्व भाजपचे षडयंत्र असल्‍याचे म्‍हटलं आहे. ( Swati Maliwal case)
काय म्हणाल्या आतिशी? 

स्वाती मालीवाल मारहाण घटना म्हणजे भाजपने रचलेले षडयंत्र
दिल्ली पोलीस भाजपच्या निर्देशानुसार काम करत आहेत.
स्वाती मालीवाल भाजपचे प्यादे.

 मालीवाल भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे, आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी आज (दि.१९) माध्यमांशी बोलताना म्हणाल्या,  ‘भाजप आणि केंद्र सरकार विरोधी नेत्यांना त्यांच्या तपास यंत्रणांद्वारे ब्लॅकमेल करून त्यांच्याशी हातमिळवणी करतात. स्वाती मालीवाल यांच्या बाबतीतही असेच घडले. ‘स्वाती मालीवाल यांची एसीबीची चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या वेळी भाजपने त्यांना प्यादे बनवले. ही भाजपची प्रमाणित कार्यपद्धती आहे. त्या भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास केल्यास सर्व काही स्पष्ट होईल. Swati Maliwal case
या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसखाेरी करत सुरक्षा भंग केल्याप्रकरणी बिभव कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरही गुन्‍हा दखल केलेला नाही. दिल्ली पोलीस भाजपच्या निर्देशानुसार काम करत आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.
काय आहे प्रकरण? 
दिल्लीच्या मुख्यमंत्री सदनात राज्यसभा खासदार आणि आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांना सोमवारी (दि. १३) अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. स्वाती मालीवाल यांनी गैरवर्तन प्रकरणानंतर मौन बाळगले होते. दरम्यान, गुरुवारी (दि.१६) दिल्ली पोलिसांनी मालीवाल यांचा जबाब नोंदवला; परंतु पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मालीवाल यांनी पोस्टमध्ये म्‍हटलं हाेतं की, ”माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. देशात महत्त्वाच्या निवडणुका सुरू आहेत, स्वाती मालीवाल महत्त्वाच्या नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपच्‍या नेत्‍यांना विशेष विनंती आहे की, या घटनेवर राजकारण करू नका.” Swati Maliwal Case
मारहाणप्रकरणी विभव कुमार यांना अटक
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी विभव कुमार यांच्यावर गुरुवारी (१६ मे) दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विभव कुमार यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार मालीवाल यांनी दाखल केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.  तर या प्रकरणात स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवालांचे नाव घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

#WATCH | Delhi Minister & AAP leader Atishi says, ” This whole incident of Swati Maliwal is a conspiracy hatched by BJP. Swati Maliwal is being used as a pawn in this conspiracy as there is a case against her in ACB (Anti-Corruption Bureau). Chargesheet has been made in the… pic.twitter.com/yafcfJBYbj
— ANI (@ANI) May 19, 2024

हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : तिहार तुरुंगात असलेले मनिष सिसोदिया ‘आप’चे स्टार प्रचारक, स्वाती मालिवाल यांना वगळले

Women’s Commission : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘स्वाती मालिवाल’ यांना सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

Go to Source