Baramati : रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा
बारामती : पुढारी वृत्तसेवा : येथील रेड बर्ड फ्लाइंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या अधिकार्यांना सहकार्य न करता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संस्थेच्या नऊ अधिकारी-कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी विमान अपघात तपास ब्युरो दिल्लीचे सहायक संचालक आनंदन पोण्णूसामी यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. 23) ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी (दि. 26) फिर्याद दाखल केली गेली. फिर्यादीनुसार रेड बर्ड संस्थेच्या करण माने, शक्ती सिंग, हर्ष दागर, रेशम चौधरी, अजुष शर्मा, मृणय रिझवी, राकेश सिंग, मार्क डिसोझा आणि गणेश जगताप (पूर्ण नावे नाहीत) यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
Pune News : खिरेश्वर भागात भात पिकांना फटका
Pune Crime News : महाळुंगे हत्येतील हल्लेखोरांची नावे निष्पन्न
सावधान ! ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं : प्रकाश आंबेडकर
बारामती एमआयडीसीतील कटफळ हद्दीत ही कंपनी कार्यरत आहे. गत महिन्यात या संस्थेची दोन विमाने कोसळली होती. त्यापैकी पहिले विमान 19 ऑक्टोबर रोजी, तर दुसरे विमान 22 ऑक्टोबर रोजी कोसळले होते. या घटनेनंतर संस्थेचा विमानोड्डाण परवाना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने निलंबित केला होता. सातत्याने गंभीर अपघात घडत असल्याने विमान अपघात तपास संस्थेकडून याची चौकशी सुरू केली गेली होती. त्यानुसार पोण्णूसामी व त्यांचे सहकारी कणीमोझी वेंधन हे दोघेही दि. 23 रोजी बारामतीत दाखल झाले. दि. 25 पर्यंत ही चौकशी सुरू राहिली. परंतु, या वेळी संस्थेकडून तपासकामी कोणतेही सहकार्य झाले नाही. उलट अडथळा आणण्याचाच प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
The post Baramati : रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : येथील रेड बर्ड फ्लाइंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून आलेल्या अधिकार्यांना सहकार्य न करता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संस्थेच्या नऊ अधिकारी-कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी विमान अपघात तपास ब्युरो दिल्लीचे सहायक संचालक आनंदन पोण्णूसामी यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. 23) ही घटना …
The post Baramati : रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या नऊ जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.