रणदीपच्या लग्नाची जोरदार तयारी ; लिन लॅशरामसोबत देव दर्शनाला
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep hooda) त्याची गर्लफ्रेंड लिन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. हा शाही विवाह लीन लॅशराम हिच्या गावी म्हणजे, मणिपूरमधील इम्फाळ येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. हा विवाह उद्या २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सपंन्न होणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या विवाहासाठी दोघेजण कपल इम्फाळमध्ये पोहोचले असून तेथील हिनगांग मंदिरास भेट दिली आहे. होणाऱ्या शुभ कार्यासाठी रणदीप आणि लिनने देवाची पुजा केली आहे. यावेळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ( Randeep Hooda Wedding )
संबंधित बातम्या
IFFI Goa 2023 : ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्कार आपल्यासाठी मोठा सन्मान: मायकेल डग्लस
Animal : मी रणबीरचा मोठा फॅन; महेश बाबूच्या संवादानंतर रणबीरची हटके रिॲक्शन
Pooja Sawant Engagement : पूजा सावंतने केला साखरपुडा, तो मिस्ट्री मॅन कोण आहे?
अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम याचा विवाह २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमध्ये पार पडणार आहे. दिनांक २९ नोव्हेंबरला दुपारपासून लग्नाच्या विधीला सुरूवात होणार आहे. हे विधी रात्रीपर्यत चालणार आहेत. हा शाही विवाह मणिपुर येथील पांरपरिक पद्धतीने आणि काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थिती संपन्न होणार आहे. लग्नानंतर रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स उपस्थिती लावणार आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी कपलने हिनगांग येथील मंदिरास भेट देवून पुजा केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.
रणदीप हुड्डा आणि लिन २०१६ पासून एकमेंकाच्या रिलेशनशिपमध्ये आहे. यानंतर आता लग्न बंधनात अडकत आहेत. लिन रणदीप हुड्डापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. लिन मणिपूरची रहिवासी आहे. लीनने ‘मेरी कॉम’, ‘रंगून’, ‘उमरिका’ या चित्रपटात अभिनय साकारलाय. तर शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’, आणि करिना कपूरसोबत ‘जाने जान’ या चित्रपटात दिसली होती. ( Randeep Hooda Wedding )
View this post on Instagram
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)
The post रणदीपच्या लग्नाची जोरदार तयारी ; लिन लॅशरामसोबत देव दर्शनाला appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep hooda) त्याची गर्लफ्रेंड लिन लॅशराम (lin laishram) हिच्यासोबत लग्न बंधनात अडकणार आहे. हा शाही विवाह लीन लॅशराम हिच्या गावी म्हणजे, मणिपूरमधील इम्फाळ येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. हा विवाह उद्या २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सपंन्न होणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या विवाहासाठी …
The post रणदीपच्या लग्नाची जोरदार तयारी ; लिन लॅशरामसोबत देव दर्शनाला appeared first on पुढारी.