डुकराच्या किडनीवर जगणार्‍या ‘त्या’ व्यक्तीचा कसा झाला मृत्यू?

वॉशिंग्टन : जगात मानवी अवयवांची मोठी कमतरता असल्याने हजारो रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी मानवी शरीरात पहिल्यांदाच डुकराची किडनी बसवण्यात आली. ही किमया अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली. पण यासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशी पहिली शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचा दोन महिन्यांनी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला हे आता डॉक्टरांनी …

डुकराच्या किडनीवर जगणार्‍या ‘त्या’ व्यक्तीचा कसा झाला मृत्यू?

वॉशिंग्टन : जगात मानवी अवयवांची मोठी कमतरता असल्याने हजारो रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी मानवी शरीरात पहिल्यांदाच डुकराची किडनी बसवण्यात आली. ही किमया अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली. पण यासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशी पहिली शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचा दोन महिन्यांनी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कोणत्या कारणांमुळे झाला हे आता डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
रिचर्ड रिक स्लेमन त्या व्यक्तीचे नाव असून शनिवारी, रुग्णालय आणि कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. या घटनेनंतर प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करणे महागात पडले का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यावर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एक निवेदन जाहीर केलंय. स्लेमनच्या किडनीचे 2018 मध्ये प्रत्यारोपण झालं होतं. पण गेल्या वर्षी ती निकामी होण्याचे संकेत मिळत असल्याने त्याला वारंवार डायलिसिस करावं लागत होतं. त्यामुळे अनेक गुंतागुंत वाढली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला डुकराची किडनी लावण्याचा निर्णय घेतला. सर्व चांगलं झालं म्हणून कुटुंबाने डॉक्टरांचे आभार मानले. पण दोन महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाला.
62 वर्षीय रिचर्डवर प्रत्यारोपित करणार्‍या पथकाने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, रिचर्डच्या मृत्यूमागे डुकराची किडनी लावणे हे कारण नाही. डुकराची किडनी रिचर्डच्या शरीरात किमान दोन वर्षे व्यवस्थित काम करू शकत होती. रिचर्ड हा टाईप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे त्रस्त होता. रिचर्डवर 16 मार्चला प्रत्यारोपण झाल्यानंतर त्याला डायलिसिसची गरज नव्हती.