डीएचएफएलचा माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) डीएचएफएलचा माजी संचालक धीरज वाधवान यांना 34 हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणात अटक केली.
सोमवारी रात्री मुंबईत त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वाधवान यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 19 जुलै 2022 रोजी वाधवान यांचे बंधू कपिल यांनाही या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दोघांशी संबंधित 75 उपकंपन्यांवरही सीबीआयने गुन्हा नोंदविला होता. दोघांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर सीबीआयने कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सार्वजनिक पैशाचा दुरुपयोग करून फसवून केल्याचा आरोप वाधवान यांच्यावर ठेवण्यात आला.