उन्हाळ्यात पेठा खाणे आरोग्यासाठी लाभदायक
नवी दिल्ली : आग्र्याची प्रसिद्ध मिठाई असलेली पेठा ही कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होते. ना खराब होण्याचा त्रास, ना ते साठवण्यासाठी रेफ्रिजरेटरची गरज. त्यामुळे उन्हाळ्यात पेठा जरूर खा, असे आहारतज्ज्ञ सांगतात. हिंदीत कोहाळ्यास ‘सफेद पेठा’ किंवा नुसतेच ‘पेठा’ म्हणतात. त्यापासून बनवलेली ही मिठाई असते. जेवणानंतर काहीतरी गोड खावेसे वाटत असेल तर कोहाळ्यापासून बनवलेला पेठा हा एक चांगला आणि आरोग्यदायी गोड पदार्थ आहे.
उन्हाळ्यात पेठा खाल्ल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. बर्फाच्या तुकड्यासारखा दिसणारा पेठा शरीरासाठी बर्फाप्रमाणेच काम करतो. पेठामध्ये एक नाही तर अनेक औषधी गुणधर्म आढळतात. पेठा उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. पेठा खाल्ल्याने उन्हाळ्यात पोटातील अल्सर, टाइप 2 मधुमेह, जळजळ आणि इतर अनेक आजार बरे करण्यास मदत करते. पेठा पोटासाठी आणि पचनासाठीही चांगला मानला जातो.
पेठा हा थंडगार आहे. रसाळ आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या पेठांमुळे पोट थंड राहते. कोहाळा किंवा पेठा उन्हाळ्यात अवश्य खावा. पेठा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता, पेटके आणि सूज असेल तेव्हा तुम्ही पेठा खाऊ शकता. पेठामुळे आतड्याचे आरोग्यही सुधारते. पेठा हे खूप कमी कॅलरी असलेले अन्न आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असते. कोहाळ्याची भाजी किंवा ज्यूस रोज प्यायल्यास वजन कमी होण्यासही मदत होते. मात्र, जास्त गोड पेठा खाल्ल्यानेही लठ्ठपणा वाढू शकतो.
पेठा शरीरात साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करतात. यामुळे किडनीमध्ये द्रवपदार्थाचा स्राव वाढण्यास मदत होते. पेठा शरीराला डिटॉक्सिफाय करून हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पेठामध्ये असे घटक असतात, जे श्वसनमार्गामध्ये जमा झालेला कफ किंवा श्लेष्मा सहजपणे बाहेर टाकतात. पेठा खाल्ल्याने श्वसनमार्ग स्वच्छ होतो. फुफ्फुस निरोगी ठेवण्यास मदत होते. अॅलर्जी झाल्यास कोहाळ्याचे किंवा पेठाचे सेवन फायदेशीर ठरते.