यड्रावमध्ये अपघातात महिला ठार

यड्राव, पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ) असे तिचे आहे. या अपघातात दहा जखमी आहेत. जकीया मल्लीक कलबुर्गी (वय 8), जैबा मल्लीक कलबुर्गी (6), आसलम पैगंबर मुजावर (8), अहमदअली उमर मुजावर (6) या 4 बालकांसह माजीया फारुक सौदागर (16), …

यड्रावमध्ये अपघातात महिला ठार

यड्राव, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ) असे तिचे आहे. या अपघातात दहा जखमी आहेत.
जकीया मल्लीक कलबुर्गी (वय 8), जैबा मल्लीक कलबुर्गी (6), आसलम पैगंबर मुजावर (8), अहमदअली उमर मुजावर (6) या 4 बालकांसह माजीया फारुक सौदागर (16), स्वालिया फारुक सौदागर (14), आयेशा उमय मुजावर (28), आलीशा पैगंबर मुजावर (13), हुसेनबी सत्तार सनदी (40) आदी जखमी आहेत. सोमवारी दुपारी अपघात झाला. जखमींना इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक-निंबाळकर सेवा सोसायटीसमोरील ओढ्याजवळ मोटारचालकाचा (क्र. एमएच 12 ईएम 7422) ताबा दुसर्‍या वाहनाला चुकवताना सुटला. त्यामुळे गाडी तीन ते चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी कलबुर्गी यांचा पाय व हात मोडल्यामुळे रक्तस्त्राव अधिक झाला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार महिलांच्या डोक्याला, हाताला, पायाला, कमरेला मोठी दुखापत झाली आहे. यामध्ये पाच मुलेही जखमी झाली आहेत.
पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. यावेळी मृतदेह व जखमींना पाहून अनेकांनी आक्रोश केला. सनदी कुटुंबीय पूर्वी रेणुकानगर यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिक त्यांना ओळखत होते. या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत होती.