परभणी: अपघातात जखमी झालेले प्रा. नितीन उंडाळकर यांचे निधन
परभणी; Bharat Live News Media वृत्तसेवा: परभणी येथील ज्ञानेश्वरी कॅरिअर अकॅडमीचे संस्थापक प्रा. नितीन नरहरी उंडाळकर (वय ४४) यांचे आज (दि.१३) सकाळी ९ वाजता निधन झाले.
नितीन उंडाळकर यांचा ८ मेरोजी रात्री कुंभकर्ण टाकळीजवळ जिंतूर रोडवर परभणीकडे येत असताना अपघात झाला होता. परभणी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय, पुतण्या, तीन बहिणी, मेहुणे, भाच्चे असा परिवार आहे. परभणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन उंडाळकर यांचे ते बंधू होत. त्यांच्या अपघाती निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
परभणी: राणीसावरगाव येथील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले
परभणी: कोल्हेवाडी येथे पीककर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपविले
परभणी : पूर्णा स्थानकातील रेल्वेच्या डब्यात आढळला महिलेचा मृतदेह