मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटली ; एक ठार, ३२ जखमी
वणी; Bharat Live News Media वृत्तसेवा- पारेगांव फाट्या नजीक कांद्यांच्या चाळीवर कामाला जाणा-या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होवून एक जण ठार झाला असून 32 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील २७ जणांना वणी ग्रामीण रुग्णालय येथे तर इतर पाच जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ९ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दि. १३ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास दह्याने (ता.चांदवड)येथील मजुर वणी येथे काद्यांच्या चाळीवर नेहमी प्रमाणेच कामासाठी येत होते. या पिकअप गाडी क्रमांक एमएच १५ एच एच ३६७८ या गाडीत अंदाजे ३२ ते ३५ जण बसले होते. पारेगांव फाट्या नजीक भरधाव वेगात येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जोरात पलटी झाली. गाडी पलटी होताच आवाज झाला. आजुबाजुच्यांनी धावत जखमींना बाहेर काढुन वणी येथील मिळेल त्या साधनाने ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच दह्याने येथील विलास भवर यांनी तरूणांच्या मदतीने जखमींना मदत केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्याने वणी डाॅक्टर असोसिएशन चे खाजगी डाॅक्टर डाॅ.अनिल पवार, डाॅ. अनिल शेळके, डाॅ. सोहम चांडोले, डाॅ.विराम ठाकरे, डाॅ. प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीने उपचार करून गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतुन नाशिक येथे पाठविण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे एकमेव डाॅ. अनंत गाडेकर हे होते.
जखमींवर उपचार करतांना मोठी दमछाक
जखमींवर उपचार करत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. येथील लाईट बंद होत्या. वातानुकुलीत कक्ष असून तेही बंद पडलेले अश्या परिस्थितीत जखमींवर उपचार करतांना मोठी दमछाक झाली. कोंडलेल्या या कक्षात गुदमरलेल्या सारखे होत होते. तश्याच परिस्थितीत उपचार करण्यात आले. तसेच मोबाईलच्या टाॅर्च लाऊन उपचार करावे लागले.
जखमींची नावे अशी
यातील जखमी कल्पना हिंगले वय ४०, तुषार बाळू जाधव वय, रंजना किसन गाडेकर वय ५०, भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे वय ३५, सुरेखा बाळू वासदेव वय ५०, अंबिका रामू भुसारे वय १७, रोहिणी वीरक हिंगले वय 15, तेजस नाडेकर वय ४, चेतन अशोक हिंगले वय १४, विशाल विरक इंगले वय १३, कार्तिक दत्तात्रय झडे वय 13, राजश्री अशोक हिंगले वय ३५, संगीता गोरख हिंगले वय 35, रोहित भाऊसाहेब हिंगले वय १५, मंगला भाऊसाहेब हिंगले वय ३५, निकिता धोंडीराम हिंगले वय १८, वैशाली अशोक हिंगले वय १५, संगीता राजेंद्र गांगुर्डे वय ४०, सपना सुरेश हिंगले वय १७, शुभम हिंगले वय १७, अशा दशरथ वासदेव वय ४०, मनोहर चंद्रभान हिंगले वय १६, यशराज संजय जाधव वय १४, शुभम काळू सोनवणे वय १६, महेश भाऊसाहेब हिंगले वय १७, रत्ना सोमनाथ शेवरे वय 35, सोनल रवींद्र भोये वय ३५. सिमा प्रकाश पिठे, पल्लवी संपत सोनवणे, ज्ञानेश्वर संपत सोनवणे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदिप सुर्यवंशी. डाॅ. अनंत पवार यांनी भेट दिली.
हेही वाचा –
UP Crime: उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार, भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
बंधारे भरण्यासाठी भामा आसखेडमधून सोडले पाणी.