रामदेववाडीतील 1283 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

रामदेववाडीतील 1283 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

जळगाव- तालुक्यातील रामदेव वाडी या कांद्याच्या ठिकाणी असलेल्या बुथ क्रमांक 307 या ठिकाणी मतदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत एकही मतदान झालेले नव्हते. मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे तहसीलदार धरणगाव व डी वाय एस पी जळगाव यांनी त्याठिकाणी जाऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी या ठिकाणच्या राहणाऱ्या अंगणवाडी सेविका यांचा कार व स्कूटर अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांची दोन मुले व भाचा यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते.  दगड फेक सुद्धा केली होती. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसांमध्ये झालेली होती. ज्या कारणे अपघात केला त्यामध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा व व्यावसायिक यांचा मुलगा व इतर जण होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या ठिकाणी सापडलेल्या गांजाची एफआयआर मध्ये नोंद सुद्धा करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून माहिती देण्यात आली होती की त्याला तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आलेले आहे.
त्यानंतर रामदेव तांडा येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुद्धा दिले होते. मात्र आज 13 मे रोजी बुथ क्रमांक 360 वर असलेल्या 1283 मतदारांनी मतदान प्रक्रिया प्रक्रियेवरच बहिष्कार टाकल्यामुळे एकच खडबड उडाली. वंजारी समाजाच्या मतदारांनी टाकलेला बहिष्कारमुळे धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी डी वाय एस पी संदीप गावित यांनी त्या ठिकाणी जाऊन मतदारांची समजूत काढून मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर एकही मतदान झाल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
हेही वाचा-

गोंदिया जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे संकट; ३ दिवस येलो अलर्ट
लातूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांचे निधन
आमच्या मागण्याही लोकसभेत मांडा..! चिमुकल्यांनी पाठविला बालहक्काचा जाहीरनामा