अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क, चिरंजीवी पत्नीसोबत पोहोचले

अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क, चिरंजीवी पत्नीसोबत पोहोचले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. तेलंगाणामध्ये आज अभिनेता अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर आणि चिरंजीवी मतदान करण्यासाठी पोलिंग बूथवर पोहोचले. हे दाक्षिणात्य कलाकार मतदानासाठी हैदराबादमधील जुबली हिल्स येथे पोहोचले.
मतदानानंतर अल्लू अर्जुन काय म्हणाला?
अल्लू अर्जुन मतदान स्थळी पांढरा रंगाचा टी-शर्ट आणि काळी जीन्स अशा पेहराव्यात दिसला. अल्लूने मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तो म्हणाला, ‘कृपया आपले मतदान नक्की करा. ही भारताच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजचा दिवस पुढील ५ वर्षांच्या जीवनासाठी सर्वात महत्वपूर्ण दिवस आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही. मी निष्पक्ष आहे.’

#WATCH | Telangana: Actor Allu Arjun casts his vote at a polling booth in Jubilee Hills, Hyderabad.
#LokSabhaElections2024 pic.twitter.com/M0yhR7XLeP
— ANI (@ANI) May 13, 2024

ज्यु. एनटीआरने कोणता संदेश दिला?
यावेळी अभिनेता ज्युनियर एनटीआरही मतदान केंद्रावर दिसला. कलाकार त्यांची पाहत रांगेत उभे होते. ‘आरआरआर’ अभिनेता त्याच्या कुटुंबीयांसह सोमवारी सकाळी मतदानासाठी पोहोचला. यावेळी अभिनेत्याने निळा शर्ट आणि पँट परिधान केली होती. मतदान केल्यानंतर त्याने जनतेला निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ‘प्रत्येकाने आपला मताधिकार वापरला पाहिजे. मला वाटते की आपण आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगला संदेश देऊ, असे तो म्हणाला.

#WATCH | Telangana: Film star Chiranjeevi Konidela and his family arrive at a polling booth in Jubilee Hills in Hyderabad to cast their vote.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/HrnDGIWdjU
— ANI (@ANI) May 13, 2024

पत्नी सुरेखासोबत मेगास्टार चिरंजीवी मतदान करायला पोहोचले. मतदानानंतर ते म्हणाले, ‘मी लोकांना आवाहन करतो की, आपल्या मताधिकाराचा उपयोग करा. कृपया या आणि आपल्या शक्तीचा उपयोग करा.’
कोणत्या दिग्गजांनी केलं मतदान?
दक्षिण भारतीय अभिनेता पवन कल्याणने मंगलगिरिमध्ये सकाळी आपल्या पत्नीसोबत मतदान केलं. नंदमुरारी बालकृष्णन यांनीही मतदान केल्यानंतर लोकांना मतदान करण्याचे आवाहन केलं. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजमौली देखील मतदान केंद्रावर पोहोचले.

#WATCH | Telangana: Actor Allu Arjun says “Please cast your vote. It is the responsibility of all the citizens of the country. Today is the most crucial day for the next 5 years. There will be a huge voter turnout, as more and more people are coming out to vote…I would like to… pic.twitter.com/y5EwVLZVRk
— ANI (@ANI) May 13, 2024