ठाणे : धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले

ठाणे : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे आज (सोमवार) सकाळ पासूनच या मार्गावरील ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तर कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. …

ठाणे : धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे आज (सोमवार) सकाळ पासूनच या मार्गावरील ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तर कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले.
काही तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, ऐन पीकअव्हर मध्ये लोकल खोळंबल्‍याने सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आदी स्थानकांसह इतर रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यातच आज तापमानात वाढ असल्याने मोठा उकाडा जाणवत असून महिला व लहान मुलांचे मोठे हाल झाले. धीम्‍या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्‍याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.
हेही वाचा : 

ब्रेकिंग : दिल्‍ली मुख्‍यमंत्रीपदी केजरीवालच राहणार, सुप्रीम काेर्टाने याचिका फेटाळली

धुळ्यात आज गृहमंत्री अमित शहा यांची सभा

Stock Market | सेन्सेक्स- निफ्टीमध्ये घट, बाजारावर कशाचा परिणाम?