सुरेश दादा जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यात व शहरावर ज्यांचे एक हाती सत्ता होती. मात्र काही कारणास्तव त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला असताना लोकसभा रणधुमाळी – 2024 च्या निवडणुकीच्या मतदानात आपला हक्क बजावला आहे. तर नुकतेच दोन दिवसा अगोदरच माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा राजीनामा देऊन भाजपाला समर्थक देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा शिवाजीनगर या ठिकाणाहून जळगाव शहराचे सत्ता केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज सोमवार (दि.१३) रोजी त्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी दोन दिवसापूर्वीच शिवेसना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तर मतदानाचा दिवस उजाडण्याच्या दोन दिवसापूर्वी भाजप पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांसाठी आपण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. त्यामुळे पुन्हा जळगाव शहराचे सत्ता केंद्र बदलले आहे. यावेळी देखील विजयाची माळ आपल्यालाच मिळेल अशी त्यांनी खात्री व्यक्त करत सांगितले आहे.