रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 साठी रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांनी रावेर येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.
शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर करतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ट्वीटमध्ये म्हटले होते की, “तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!”
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024