जळगाव : मतदारांनी केले सकाळच्या सत्रातच मतदान करणे पसंत
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जळगावमध्ये सर्वत्र जास्त तापमान असून दुपारी उन्हाचा कडका जाणवतो. त्यामुळे काही मतदारांनी सकाळच्या सत्रातच मतदान करणे पसंत केले आहे. त्यामुळे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय हरी विठ्ठल नगरमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि निवडणुक आयोग यांच्या स्विप कार्यक्रमामुळे केलेल्या मतदान जनजागृतीमुळे आज सोमवार (दि.१३) रोजी मोठ्या संख्येने सकाळीच मतदार घराबाहेर पडताना दिसून येत आहेत.
जिजामाता माध्यमिक विद्यालय हरी विठ्ठल नगर