बांगला देशचा कर्णधार शाकिब लोकसभा निवडणूक लढवणार
ढाका : बांगला देशचा कर्णधार शाकिब अल हसन नव्या खेळीची सुरुवात करत असून त्याने राजकारणात पाऊल ठेवले आहे. आयसीसी वन डे विश्वचषक 2023 मध्ये वादग्रस्त अपीलमुळे चर्चेत राहिलेला शाकिब आता लोकसभेची निवडणूक लढणार आहे. तो त्याच्या जिल्ह्यातील मागुरा -1 या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. 7 जानेवारीपासून होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बांगला देश अवामी लीगकडून शाकिब निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.
शाकिबच्या आधी मशरफे मुर्तजा याने निवडणूक लढवली आहे. तो खासदार असताना देखील क्रिकेट खेळला आहे. निवडणूक लढण्यापूर्वी शाकिब बांगला देश संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे कळते. शाकिब अल हसन नवीन खेळी करणार असल्याची माहिती त्याने काही दिवसांपूर्वीच दिली होती. शाकिब त्याच्या जिल्ह्यातील दक्षिण-पश्चिम गृह जिल्हा मागुरा किंवा राजधानी ढाका येथील जागेवरून निवडणूक लढवू शकतो, असे बांगला देश अवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस नसीम यांनी सांगितले होते.
सध्या बांगला देशचे पंतप्रधानपद शेख हसीना यांच्या हाती आहे. यावेळीही विरोधी पक्षांचा बहिष्कार कायम राहिल्यास चौथ्यांदा त्या सत्तेत परतणार हे जवळपास निश्चित आहे. हसीना यांनी देशाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. परंतु पाश्चात्त्य देशांनी लोकशाही व्यवस्थेच्या घसरणीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
The post बांगला देशचा कर्णधार शाकिब लोकसभा निवडणूक लढवणार appeared first on पुढारी.
ढाका : बांगला देशचा कर्णधार शाकिब अल हसन नव्या खेळीची सुरुवात करत असून त्याने राजकारणात पाऊल ठेवले आहे. आयसीसी वन डे विश्वचषक 2023 मध्ये वादग्रस्त अपीलमुळे चर्चेत राहिलेला शाकिब आता लोकसभेची निवडणूक लढणार आहे. तो त्याच्या जिल्ह्यातील मागुरा -1 या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. 7 जानेवारीपासून होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बांगला देश अवामी लीगकडून शाकिब …
The post बांगला देशचा कर्णधार शाकिब लोकसभा निवडणूक लढवणार appeared first on पुढारी.