सोलापूर : दुचाकीला ट्रकची धडक; गर्भवती महिलेचा मृत्यू

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : माहेरी आई-वडिलांना भेटून पतीसोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगी जवळील कामोणे फाट्याजवळ झाला. सोनाली पंकज काबंळे (वय १९, रा. भीमनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तसेच पती पंकज रणजित कांबळे (वय २२ रा. भीमनगर) …

सोलापूर : दुचाकीला ट्रकची धडक; गर्भवती महिलेचा मृत्यू

करमाळा; Bharat Live News Media वृत्तसेवा : माहेरी आई-वडिलांना भेटून पतीसोबत सासरी जात असताना दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगी जवळील कामोणे फाट्याजवळ झाला. सोनाली पंकज काबंळे (वय १९, रा. भीमनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तसेच पती पंकज रणजित कांबळे (वय २२ रा. भीमनगर) हा देखील जखमी झाला आहे.
पंकज कांबळे व सोनाली हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. आठ महिन्यांची गर्भवती असलेली सोनाली नागलवाडी (ता. कर्जत) येथे आई वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तिला पती पंकज याने मोटरसायकल (एम एच १६/ डि एफ १८५०) वरून घेऊन गेला होता. परत गावी करमाळ्याकडे येताना अहमदनगर-करमाळा या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी गावाजवळील कामोणे फाट्याजवळ अहमदनगरकडून करमाळ्याकडे येणा-या ट्रकने (टी.एन ५२/एम ३४६९) दुचाकीला पाठिमागून जोरदार धडक दिली. यामुळे सोनाली दुचाकीवरून पोटावर पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला होता. याप्रकरणी ट्रकचालकाला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : 

सोलापूर: क्रुझरचा टायर फुटून ३ शेतमजूर महिला ठार, ८ जखमी
सोलापूर : म्हैसलगी येथील भीमा नदीत बुडून दोन मुलींचा मृत्यू