नाशिक : कुस्तीपटू लहामगे खून प्रकरणातील संशयित गजाआड

नाशिक : कुस्तीपटू लहामगे खून प्रकरणातील संशयित गजाआड

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
नाशिक मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात कुस्तीपटू भूषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची शुक्रवारी (दि. १०) मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मारेकऱ्याच्या वडिलांना अटक केली आहे.
यशवंत पुंजाजी लहामगे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. भूषण लहामगे हे शुक्रवारी (दि.१०) दुपारी दुचाकीवरून पाथर्डी फाटा ते सांजेगाव असे जात होते. त्यावेळी कारमधून आलेल्या मारेकऱ्यांनी भूषणच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर भूषण यांनी दुचाकी सोडून पळ काढला असता मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयता, चॉपरने वार करून हत्या केली. हल्ला करून मारेकरी पसार झाले. याप्रकरणी अदिती भूषण लहामगे यांनी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात भूषणचा चुलत भाऊ वैभव यशवंत लहामगे, त्याचे वडिल यशवंत लहामगे व आई सुमनबाई यशवंत लहामगे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तास करीत यशवंत यांना अटक केली आहे. जमिनीचा व आर्थिक कारणावरून संशयितांनी भूषण लहामगे यांची हत्या केल्याचे समोर येत आहे.
यामुळे केली हत्या
अदिती यांच्या फिर्यादीनुसार, सांजेगाव येथील शिवाचे ओहोळ येथे लहामगे कुटुबीयांची सामाईक शेती असून त्याच्या वाटणीवरून भूषण यांच्यासोबत वैभव आणि यशवंत लहामगे यांचे वाद सुरु होते. त्यातून वैभवसह त्याच्या आईवडिलांनी भूषण यांना व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भूषण ही दहशतीत वावरत होते. यशवंत व सुमनबाई यांनी चिथावणी दिल्यामुळे वैभवने इमारत मारेकऱ्यांसोबत मिळून भूषण यांच्यावर हल्ला करीत हत्या केल्याचे अदिती यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:

नाशिक : अंबड येथे मद्यपी कारचालकाने नागरिकांना उडविले, सहा जण जखमी
‘माऊथवॉश’ लावणार पोटातील कर्करोगाचा छडा
Arvind Kejriwal: केजरीवालांच्या निवासस्थानी ‘आप’ आमदारांची खास बैठक