केजरीवालांच्या निवासस्थानी ‘आप’ आमदारांची खास बैठक

केजरीवालांच्या निवासस्थानी ‘आप’ आमदारांची खास बैठक


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा ईडी प्रकरणात आपचे आमदार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन अंतरिम मंजूर झाला आहे. त्यामुळे ते सध्या तुरुंगातून बाहेर आहेत. दरम्यान पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया शनिवारी २५ मे रोजी दिल्लीत होत आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी (Arvind Kejriwal) त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (दि.१२) सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. यासाठी आपचे आमदार हजेरी लावत आहेत.
तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर सीएम केजरीवाल यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी 1 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत ही बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी २५ मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यासाठी आम आदमी पक्षाचे आमदार केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) निवासस्थानी हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.

Delhi CM Arvind Kejriwal to meet with AAP MLAs today, first after exit from jail
Read @ANI Story | https://t.co/5IiAQgm8uh#AAP #ArvindKejriwal pic.twitter.com/nduBIrwo3r
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2024

Arvind Kejriwal: असा असेल मुख्यमंत्री केजरीवालांचा आजाचा कार्यक्रम
सकाळी 11 – आमदार मीटिंग
दुपारी 1 – प्रेस कांफ्रेंस पार्टी ऑफिस
दुपारी 4 – रोड शो (नवी दिल्ली लोक सभा – मोती नगर)
संध्याकाळी 6 – रोड शो  (पश्चिम दिल्ली लोकसभा – उत्तम नगर)

आज मिलते हैं –
11 am – MLA मीटिंग
1 pm – प्रेस कांफ्रेंस पार्टी ऑफिस
4 pm – रोड शो – नई दिल्ली लोक सभा – मोती नगर
6 pm – रोड शो – पश्चिम दिल्ली लोक सभा – उत्तम नगर
आप सभी आना।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 12, 2024

Go to Source