बीड : चिंचोलीमाळी येथे शेतकऱ्याने जीवन संपवले

बीड : चिंचोलीमाळी येथे शेतकऱ्याने जीवन संपवले

केज, Bharat Live News Media वृत्तसेवा : चिंचोलीमाळी (ता. केज) येथील शेतकरी संतोष कारभारी नेमट (वय.42) या शेतकऱ्याने शेतामधील झाडाला शुक्रवारी (दि.10) सकाळी 9 च्या सुमारास गळफास लावून जीवन संपवले. त्यांनी जीवन संपवल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Beed News)
या घटनेची माहिती बिट जमादार बाळासाहेब बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे. मयताचा भाऊ वचिष्ट कारभारी नेमट यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास जमादार बाळासाहेब बांगर हे तपास करीत आहेत. (Beed News)
हेही वाचा : 

नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील
नांदेड : धर्माबाद- कंदकुर्ती मार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार, एक जखमी
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

Latest Marathi News बीड : चिंचोलीमाळी येथे शेतकऱ्याने जीवन संपवले Brought to You By : Bharat Live News Media.