नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलसचिव म्‍हणून प्रो. आनंद पाटील यांनी पदभार स्वीकारला. प्रो. पाटील हे विश्‍वविद्यालयातील दूर शिक्षण निदेशालयाचे निर्देशक आहेत, त्‍यांना कुलसचिव पदाची अतिरिक्‍त जबाबदारी देण्‍यात आली आहे. विश्‍वविद्यालयातील प्रशासकीय व अकादमिक कामांना गती देण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात येईल अशी प्रतिक्रिया त्‍यांनी कार्यभार स्वीकारताना  व्‍यक्‍त केली. कुलगुरु प्रो. … The post नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील appeared first on पुढारी.

नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलसचिव म्‍हणून प्रो. आनंद पाटील यांनी पदभार स्वीकारला. प्रो. पाटील हे विश्‍वविद्यालयातील दूर शिक्षण निदेशालयाचे निर्देशक आहेत, त्‍यांना कुलसचिव पदाची अतिरिक्‍त जबाबदारी देण्‍यात आली आहे.
विश्‍वविद्यालयातील प्रशासकीय व अकादमिक कामांना गती देण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात येईल अशी प्रतिक्रिया त्‍यांनी कार्यभार स्वीकारताना  व्‍यक्‍त केली. कुलगुरु प्रो. कृष्‍ण कुमार सिंह यांच्‍यासह अध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. नांदेड जिल्‍हयातील माचनुर येथे जन्‍मलेले प्रो. पाटील यांनी स्‍वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथून हिंदी, इतिहास व अर्थशास्‍त्रात बी.ए. तर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातून हिंदीतून एम.ए., एम.फिल. (स्‍वर्ण पदक) व पीएच.डी. प्राप्‍त केली आहे.
साहित्‍यालोचन, नाट्यालोचन, प्रयोजनमूलक हिंदी, अनुवाद अध्‍ययन, तुलनात्‍मक अध्‍ययन, पारिस्थितिकीय अध्‍ययन, मीडिया व पत्रकारिता तर सिनेमा अध्‍ययन यासारखे विषय त्‍यांच्‍या शोध व शैक्षणिक आवडीचे क्षेत्र आहेत. ते उस्‍मानिया विद्यापीठ, हैदराबाद, तमिळनाडू केंद्रीय विद्यापीठात सहायक प्राध्‍यापक व सहायक निदेशक (राजभाषा), प्रशासनिक व संपदा अधिकारी राहिले आहेत. पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातही त्‍यांचा दांडगा अनुभव असून ते ईटीव्‍हीत पटकथा लेखक व कार्यक्रम सहायक तर मीडिया मर्चंट, हैदराबाद येथे सहयोगी जनसंपर्क अधिकारी राहिले आहेत.
तमिळनाडू केंद्रीय विश्‍वविद्यालयात त्‍यांनी ‘हिंदी क्‍लब’ची स्‍थापना करुन स्‍थानिक विद्यालयांमध्‍ये हिंदीचा प्रचार-प्रसार केला. हिंदी विभागाची स्‍थापना केली व हिंदी विभागाचे संस्‍थापक अध्‍यक्ष म्‍हणून काम केले. त्‍यांचे ‘संस्‍कृति बनाम अपसंस्‍कृतिकरण, हिंदी : विविध आयाम, विश्‍व के बीस अमर उपान्‍यास हे ग्रं‍थ प्रकाशित असून ‘मौन संविधान : भयानक परिणाम पुस्‍तकाचे ते सह-लेखक आहेत. त्‍यांना मराठी व हिंदी सह तमिल आणि तेलुगु भाषाही अवगत आहेत.
Latest Marathi News नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील Brought to You By : Bharat Live News Media.