कोल्हापूर: मुलाच्या अपहरणाची अफवा; परप्रांतीय भिक्षुकांना चोपले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: शाळकरी मुलाच्या अपहरणाची अफवा पसरताच दोन परप्रांतीय तरूणांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. संतप्त जमावाने बेदम धुलाई करून त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या (Kolhapur News) हवाली केले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे निष्पन्न झाले. संशयित तरूण भिक्षुक असून कुटुंबियासह त्याचे मिरज येथील कृपामयी हॉस्पिटल जवळील झोपडपट्टीत वास्तव्य … The post कोल्हापूर: मुलाच्या अपहरणाची अफवा; परप्रांतीय भिक्षुकांना चोपले appeared first on पुढारी.

कोल्हापूर: मुलाच्या अपहरणाची अफवा; परप्रांतीय भिक्षुकांना चोपले

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा: शाळकरी मुलाच्या अपहरणाची अफवा पसरताच दोन परप्रांतीय तरूणांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. संतप्त जमावाने बेदम धुलाई करून त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या (Kolhapur News) हवाली केले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे निष्पन्न झाले. संशयित तरूण भिक्षुक असून कुटुंबियासह त्याचे मिरज येथील कृपामयी हॉस्पिटल जवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले.
नेमका प्रकार काय?

राजारामपुरीतील शाळकरी मुलगा लॉ कॉलेजजवळ मित्राच्या दुकानाजवळ थांबला होता.
याचवेळी दोन अनोळखी तरूण तेथून जात होते.
तरूणांच्या संशयास्पद हालचालीमुळे रिक्षा चालकाला संशय आला.
तरूण मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असावेत, अशी शंका
दोन तरूणांची पाठलाग करून धुलाई

Kolhapur News : कोल्हापूर शहरात  पसरली वाऱ्यासारखी अफवा
दरम्यान, मुले पळवून नेण्याच्या घटनेची शहरात वाऱ्यासारखी अफवा पसरताच घटनास्थळासह शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात शनिवारी दुपारी मोठी गर्दी झाली. पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर हे संतप्त जमावासमोर पुढे येवून या प्रकारात काहीही तथ्थ नसल्याचे सांगून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले.
त्याच झाल असं… शनिवारी दुपारी साडेबाराला राजारामपुरी पाचवी गल्लीत राहणारा १३ वर्षीय शाळकरी मुलगा लॉ कॉलेजजवळ मित्राच्या दुकानाजवळ थांबला होता. याचवेळी दोन अनोळखी तरूण तेथून जात होते. तरूणांच्या संशयास्पद हालचालीमुळे रिक्षा चालकाला संशय आला. संबंधित तरूण मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असावेत, अशी शंका आल्याने त्यांनी आरडा-ओरड केली.
रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे घटनास्थळी गर्दी झाली. जमावाने दोनही तरूणांना प्रश्नाचा भडीमार सुरू केला. दोघेही काही बोलत नसल्याने जमाव संतप्त झाला. दोघांची चांगलीच धुलाई करण्यात आली. दरम्यान, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर घटनास्थळी पोहोचले. शाळकरी मुलांसह संशयित तरूणांना ताब्यात घेतले.
कुटुंबियांशीही संपर्क साधून खातरजमा केली
पोलिस ठाण्यात त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. मात्र हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे निदर्शनास आले. संशयित तरूणांची समीर जोगी आणि सोहेल जोगी अशी नावे आहेत. ते मुळचे उत्तरप्रदेश येथील आहेत. भिक्षा मागण्यासाठी शहरात भटकतात. मिरजेत कृपामयी हॉस्पिटलजवळील झोपडपट्टीत त्यांचे वास्तव्य आहे. मिरज पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांसह त्याच्या कुटुंबियांशीही संपर्क साधून खातरजमा करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.
हेही वाचा 

कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वळवाचा तडाखा : सहा जखमी
कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या युवकाचा कासारी धरणात बुडून मृत्यू
कोल्हापूर विमानतळ जगाच्या हवाई नकाशावर

Latest Marathi News कोल्हापूर: मुलाच्या अपहरणाची अफवा; परप्रांतीय भिक्षुकांना चोपले Brought to You By : Bharat Live News Media.