Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा सर्वात अनुभवी आणि वयस्कर वेगवान गोलंदाज अशी ओळख असणार्या जेम्स अँडरसन ( James Anderson ) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 10 जुलैपासून पासून सुरु हेणारा लॉर्ड्सवरील कसोटी सामना माझ्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल, अशी पोस्ट त्याने केली आहे.
काय म्हणाला James Anderson ?
अँडरसन याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “लॉर्ड्सवरील उन्हाळ्यातील पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल. माझ्या लहानपणापासून मला आवडलेला खेळ खेळताना, माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना ही 20 वर्षे माझ्यासाठी अतुलनीय ठरली आहेत. मी इंग्लंड संघातून बाहेर पडणे माझ्यासाठी काही तरी गमावण्यासारखंच आहे; परंतु मला माहित आहे की इतरांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.”
“डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेमाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे खूप खूप आभार. तसेच, जगातील सर्वोत्तम काम करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभार. पुढे असलेल्या नवीन आव्हानांसाठी, तसेच माझे दिवस आणखी गोल्फने भरून काढण्यासाठी मी उत्सुक आहे. वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, असेही त्याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
View this post on Instagram
A post shared by James Anderson (@jimmya9)
James Anderson : कसोटीत ७०० विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवची विकेट घेत इतिहास रचला होता. कुलदीप यादव च्या रूपाने त्याने वयाच्या ४१ व्या वर्षी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 700 वा बळी टिपला. यासह अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळींचा टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज तर एकूण जगातील तिसरा खेळाडू ठरला होता. अँडरसनच्या आधी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेण्याची आश्चर्यकारक कामगिरी केली हाेती. यामध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांनी 800 तर ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या नावावर 708 विकेटची नोंद आहे.
700 विकेट घेण्यासाठी अँडरसनला 187 सामन्यांच्या 348 डावांचा अवधी लागला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विश्वविक्रमही अँडरसनच्या नावावर आहे. त्याने 21 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 40 हजार चेंडू टाकले आहेत.
घरच्या मैदानावर 100 कसोटी सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने घरच्या मैदानावर 100 कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला होता.
Veteran England fast-bowler James Anderson has confirmed via his Instagram post that England’s first Test of the summer, against West Indies at Lord’s, will be the last Test of his career. pic.twitter.com/LGN6DQVcEp
— IANS (@ians_india) May 11, 2024
जेम्स अँडरसनची कसोटी कारर्कीद
जेम्स अँडरसनचा जन्म ३० जुलै १९८२ मध्ये झाला. जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने इंग्लंडसाठी 187 कसोटी सामने खेळले आहेत. 9 मार्च 2024 राेजी त्याने 700 बळींचा टप्पा पूर्ण केला, अशी कामगिरी करणारा ताे जगातील एकमेव वेगवान गाेलंदाज आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत, तो ICC पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीत जगातील सातव्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज आहे. कसाेटील फलंदाज म्हणून, जो रुटबरोबर कसोटीत सर्वाधिक दहाव्या विकेटसाठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे (१९८).
भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात केले होते दमदार कमबॅक
२०२१ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात भारताविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा जेम्स अँडरसन हा ओल्ड इज गोल्ड ठरला होता. 39 वर्षीय जेम्स अँडरसनने याने भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला. 29 षटकात त्याने 62 धावा खर्च करुन पाच विकेट घेतल्या होत्या.
अँडसरन हाेता सचिनच्या ‘त्या’ विक्रमाच्या समीप
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. अँडरसनने आतापर्यंत 187 कसोटी सामने खेळले आहे. यंदा जुलै महिन्यात इंग्लंडला मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध सहा कसोटी सामने होणार आहे. मात्र यातील पहिल्या सामन्यानंतर अँडरसन हा निवृत्त होणार आहे.
हेही वाचा :
Test Cricket : डावखुर्या विदेशी फिरकीपटूंची भारताविरुद्ध कसोटीतील संस्मरणीय कामगिरी
Pakistan Cricket Team : T-20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल, ‘मॅच फिक्सर’चे पुनरागमन
Mohammed Shami in Test Cricket : शमीने मोडला विराटचा विक्रम! कसोटी क्रिकेमध्ये केला नवा विक्रम
Latest Marathi News इंग्लंड ‘ओल्ड इज गोल्ड’ला मुकणार..!अँडरसनने केली निवृत्तीची घाेषणा Brought to You By : Bharat Live News Media.