’व्हिस्टाडोम’ प्रवासात डेक्कन एक्स्प्रेस आघाडीवर..! रेल्वे प्रवाशांची वाढतेय पसंती
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रेल्वेकडून उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘व्हिस्टाडोम’ कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आर्थिक वर्षात (2023-24) या कोचच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात पुणे- मुंबई मार्गावर धावणारी ‘डेक्कन एक्स्प्रेस’ (क्र.11007/11008) आघाडीवर आहे. त्यानंतर याच मार्गावर धावणार्या प्रगती एक्स्प्रेसचा दुसरा, जनशताब्दी एक्स्प्रेसचा तिसरा क्रमांक लागतो. तर पुणे- मुंबई प्रवाशांची लाडकी असलेल्या डेक्कन क्वीनचा चौथा क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासादरम्यान नयनरम्य द़ृश्य पहाता यावे, याकरिता विशेष डब्यांची रचना केली. या डब्यालाच ‘व्हिस्टाडोम कोच’ म्हटले जाते. उत्पन्नवाढीसाठी रेल्वेने हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाला अलीकडील काळात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे डबे रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट सेक्शन, नयनरम्य धबधबे प्रवाशांना पहाता यावे, याकरिता अनेक रेल्वे गाड्यांना बसवले आहेत. मात्र, प्रवाशांकडून ठराविक कालावधीत म्हणजे सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास या डब्यांचा वापर केला जात आहे. या डब्यांमधील अत्याधुनिक सुविधांचा आनंद घेत, रेल्वे प्रवासी पुणे- मुंबई मार्गावर प्रवास करत आहेत.
हेही वाचा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’
Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार
केवळ आठच प्रकल्पांना प्रक्रियायुक्त पाणी..!