घसरणीतून शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि.१०) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७२,९00 जवळ गेला. तर निफ्टी १५० अंकांनी वाढून २२,१०० हजारांवर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत ऑटो आणि एनर्जी शेअर्स आघाडीवर आहेत. गुरुवारी सेन्सेक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला होता. तर निफ्टी ३४५ …

घसरणीतून शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (दि.१०) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७२,९00 जवळ गेला. तर निफ्टी १५० अंकांनी वाढून २२,१०० हजारांवर व्यवहार करत आहे. बाजारातील तेजीत ऑटो आणि एनर्जी शेअर्स आघाडीवर आहेत.
गुरुवारी सेन्सेक्स १,०६२ अंकांच्या घसरणीसह ७२,४०४ वर बंद झाला होता. तर निफ्टी ३४५ अंकांनी घसरून २१,९५७ वर स्थिरावला होता. दरम्यान, कालच्या घसरणीतून आज सेन्सेक्स आणि निफ्टी सावरले.
सेन्सेक्सवर आयटीसी, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर इन्फोसिस, एचसीएल टेक, एलटी हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टीवर बीपीसीएल, आयटीसी, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर LTIMindtree, इन्फोसिस, ग्रासीम हे शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
आशियातील जपानचा निक्केई निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. चीनमधील निर्देशांकही तेजीत आहेत. हाँगकाँगचा हँगसेंग १ टक्क्यांनी वाढला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात तो आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला.
हे ही वाचा :

सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी उडाले
‘अक्षय तृतीया’ला सोनं खरेदी करताय! जाणून घ्या प्रति तोळा दर

Go to Source