सुरेश धस यांना धक्का: ॲड. रिजवान शेख यांनी हातात घेतली तुतारी
आष्टी: Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचे विश्वासू ॲड. रिजवान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची उपस्थिती होती. शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे आमदार धस यांना मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार सुरेश धस यांची अत्यंत विश्वासू म्हणून शेख यांची ओळख
आमदार सुरेश धस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून शेख यांना ओळखले जातात. आष्टी शहर व तालुक्यामध्ये त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. मागील अनेक वर्षांपासून आमदार धस यांनाच पक्ष मानून एकनिष्ठपणे ते काम करत आहेत.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयासाठी आष्टी शहरात व तालुक्यात रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सोनवणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी व विजयासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ॲड. शेख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा
बीड : तलवार बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक
बीड : गेवराई पोलिसांनी खामगाव चेक पोस्टवर पकडले एक कोटी रुपये
बीड : नेकनूरजवळ तिहेरी अपघात; एक ठार