सोलापूर: बागलवाडी येथे पेट्रोल टाकून ईव्हीएम मशिन जाळण्याचा प्रयत्न

सांगोला : पुढारी वृत्तसेवा : बागलवाडी (ता. सांगोला) येथे आज (दि.७) साडेबारा वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम  मशिनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.  ९० हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी संशयित आरोपी दादासो मनोहर चळेकर याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की,  बागलवाडी येथे मतदान चालू होते. अचानक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास …

सोलापूर: बागलवाडी येथे पेट्रोल टाकून ईव्हीएम मशिन जाळण्याचा प्रयत्न

सांगोला : Bharat Live News Media वृत्तसेवा : बागलवाडी (ता. सांगोला) येथे आज (दि.७) साडेबारा वाजण्याच्या सुमारास ईव्हीएम  मशिनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.  ९० हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी संशयित आरोपी दादासो मनोहर चळेकर याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,  बागलवाडी येथे मतदान चालू होते. अचानक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दादासो  चळेकर मतदान करण्यासाठी केंद्र क्र. ८६ मध्ये गेले. मतदान करण्याच्या तीन मशिनवर त्यांनी पेट्रोल टाकले. त्यामुळे आग लागल्याने केंद्रात  मोठा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी आग विझवली. यावेळी संशयित आरोपी बाहेर जाऊन आमच्या गावात पिण्यासाठी पाणी नाही मतदान करायला मशिन कशाला घेऊन आला असे म्हणत होता.
या प्रकारामुळे तब्बल एक तास मतदान बंद ठेवण्यात आले. साधारणपणे अर्ध्या तासानंतर दुसऱ्या मशीन जोडून मतदान सुरळीत चालू झाले. या ठिकाणच्या मतदानासाठी वेळेत ही बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान होणार आहे. यावेळी तहसीलदार संतोष कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. दादासो चळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात मतदान मशीनची ९० हजारांचे नुकसान केले.  मतदान केंद्रावर बाधा आणली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा 

सोलापूर: माढ्यात दुपारी तीन पर्यंत ३७.०५ टक्के मतदान; कुर्डू येथे मतदानावर बहिष्कार 
Solapur Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5.97 टक्के, माढ्यात 5.15 टक्के मतदान
सोलापूर : ‘उजनी’तून १० मे रोजी पाणी सोडणार