लोकसभा निवडणूक २०२४ : गुगलने बनवले खास डूडल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल महत्त्वाच्या प्रसंगी आणि दिवसांना खास  डूडल (Google Doodle Today) बनवते. आजही (दि.७) गुगलने खास आणि हटके डूडल बनवत गुगल युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आज देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निमित्ताने गुगलने डूडलद्वारे  मतदारांना महत्वाच्या तारखा, मतदान कसे करावे, नोंदणी कशी करावी इत्यादी माहिती दिली आहे. लोकसभा …

लोकसभा निवडणूक २०२४ : गुगलने बनवले खास डूडल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गुगल महत्त्वाच्या प्रसंगी आणि दिवसांना खास  डूडल (Google Doodle Today) बनवते. आजही (दि.७) गुगलने खास आणि हटके डूडल बनवत गुगल युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आज देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निमित्ताने गुगलने डूडलद्वारे  मतदारांना महत्वाच्या तारखा, मतदान कसे करावे, नोंदणी कशी करावी इत्यादी माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी (लोकसभा निवडणूक 2024) आज भारतात मतदान होत आहे. यानिमित्त गुगलने खास डूडल बनवले आहे. यासोबतच सर्च इंजिनने आपल्या यूजर्सना निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होत आहे. यासाठी 120 महिलांसह 1,300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देखील आज गुजरातमध्ये मतदान केले आहे.
गुगलने बनवलेले डूडल
 गुगलच्या डूडलमध्ये काय आहे खास?
लोकसभा निवडणूक निमित्ताने गुगलने डूडलद्वारे भारतीय निवडणुकांबाबत आपल्या वापरकर्त्यांना माहिती दिली आहे. आजच्या गुगल जगभरातील वापरकर्त्यांना भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची माहिती देत ​​आहे. आजच्या गुगल डूडलचे नाव आहे भारताची सार्वत्रिक निवडणूक 2024. गुगल डूडलमध्ये मत दिलेल्या व्यक्तीचा हात दिसत आहे. बोटावर शाईच्या खुणा आहेत, ज्या मतदान केल्यानंतर  लावल्या जातात. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानिमित्त गुगलनेही डूडलद्वारे आपल्या युजर्सना उपयुक्त माहिती दिली आहे. 7 मे 2024 च्या डूडलद्वारे, Google ने मतदारांना महत्वाच्या तारखा, मतदान कसे करावे, नोंदणी कशी करावी इत्यादी महत्वाची माहिती दिली आहे. याआधी, 19 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी Google ने डूडल तयार केले होते.
गूगल डूडल काय आहे?
गुगल डूडल हे गुगलचे एक खास असं फीचर आहे. १९९८ मध्ये गुगलने पहिल्यांदा डूडल तयार केले होते. गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांनी डिझाईन केले होते. त्याच्या नंतर गुगल प्रत्येक खास प्रसंग साजरा करण्यासाठी  डूडल तयार करते.
हेही वाचा 

लोकसभा निवडणूक : राज्यातील बारामती मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत सर्वात कमी १४.६४ टक्के तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक २३.७७ टक्के मतदान
काँग्रेसकडून प्रचारासाठी विदर्भातील नेत्यांची फौज; केदार आणि ठाकूर यांच्यासह सहा नेत्यांवर जबाबदारी
अखेरच्या क्षणी पाच जागा दिल्याने शिंदे गटाची अग्निपरीक्षा; भाजपने राज्यात जागावाटपाची रणनीती बदलली

Go to Source