काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधण्याचा मनसुबा, विश्व हिंदू परिषदेचा दावा

काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधण्याचा मनसुबा, विश्व हिंदू परिषदेचा दावा

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: राम मंदिराऐवजी बाबरी बांधण्यासारखे काँग्रेसचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेद्वारे आज (दि.७ मे) करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला तरी राहुल गांधी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधतील, असा खुलासा काँग्रेसच्या एका जुन्या ज्येष्ठ नेत्याने केल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ.सुरेंद्र जैन यांनी केला. (Vishwa Hindu Parishad)

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीदरम्यान भाजपसह काँग्रेस आणि सर्वच पक्ष आपापल्या पक्षांचा ताकदीने प्रचार करण्यात गुंतले आहेत. यामध्ये धार्मिक मुद्देही चर्चेत येत आहेत. विशेषतः राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी डॉ. सुरेंद्र जैन यांनी एक खळबळजनक दावा केला. (Vishwa Hindu Parishad)

“काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास राम मंदिराच्या ठिकाणी बाबरी मशीद बांधतील, अशी माहिती काँग्रेसच्या एक ज्येष्ठ नेत्याने दिली, असा दावा त्यांनी केला. तसेच या गोष्टीसाठी शाहबानोप्रमाणे घटनादुरुस्ती करावी लागेल. त्याचा हेतू खूपच चिंताजनक आहे. याचे अद्याप कोणीही खंडन केलेले नाही. याचा अर्थ त्याने आरोप मान्य केला आहे,” असेही डॉ. जैन म्हणाले.(Vishwa Hindu Parishad)

Go to Source