विजय वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ मताशी काँग्रेस सहमत नाही : रमेश चेन्नीथला
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानापासून काँग्रेसने फारकत घेतली आहे. वडेट्टीवार यांच्या त्या मताशी काँग्रेस सहमत नाही, ते त्यांचे वैयक्तिक विधान आहे, अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाची भूमिका विशद केली. रमेश चेन्निथला म्हणाले, आम्ही हेमंत करकरे यांचा आदरच करतो. काँग्रेस कायम सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे.
पराभवाच्या भीतीने मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लिम
लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तानची भाषा करत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल रमेश चेन्नीथला यांनी केला.
हेही वाचा
विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकारण तापले!
…तरीही कसाब फासावर गेलाच असता : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : काँग्रेस एकसंघ, भाजपमध्येच गटबाजी जोरात : विजय वडेट्टीवार
पहा व्हिडिओ – विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रमेश चेन्नीथलांचं मोठ विधान