Blessing ! अवघ्या 750 ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कमला नेहरू रुग्णालयात नवजात शिशू बालकांच्या कक्षात कमी दिवसांच्या आणि कमी वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. सातव्या महिन्यात जन्मलेल्या 750 ग्रॅम वजनाच्या बाळावर 52 दिवस उपचार करण्यात आले. श्रद्धा धमाले या गर्भवती महिलेने सातव्या महिन्यात एका मुलीला घरीच जन्म दिला. बाळ वेळेआधी जन्माला आल्याने आणि कमी वजनाचे …

Blessing ! अवघ्या 750 ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कमला नेहरू रुग्णालयात नवजात शिशू बालकांच्या कक्षात कमी दिवसांच्या आणि कमी वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. सातव्या महिन्यात जन्मलेल्या 750 ग्रॅम वजनाच्या बाळावर 52 दिवस उपचार करण्यात आले. श्रद्धा धमाले या गर्भवती महिलेने सातव्या महिन्यात एका मुलीला घरीच जन्म दिला. बाळ वेळेआधी जन्माला आल्याने आणि कमी वजनाचे असल्याने पालकांनी त्याला 17 मार्च रोजी म्हणजे जन्मानंतर चार तासांनी कमला नेहरू रुग्णालयात सकाळी 7 वाजता दाखल केले. कमला नेहरू रुग्णालयात दाखल करताना बाळाची स्थिती अत्यंत नाजूक होती.
बाळ निळे पडले होते. हालचालही कमी झाली होती. डॉक्टर आणि सिस्टरच्या पथकाने तत्परता दाखवत बाळाला लगेच व्हेंटिलेटर सपोर्ट दिला. बाळाला पंधरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बाळ स्वत: श्वास घेऊ लागल्यावर व्हेंटिलेटर काढण्यात आला. उपचारांदरम्यान बाळाला तीन वेळा रक्त चढवण्यात आले. त्याच्या डोळ्यांची, कानांचीही तपासणी करण्यात आली. सर्व तपासण्या झाल्यावर आणि रिपोर्ट नॉर्मल आल्यावर बाळाला सुखरूप घरी सोडण्यात आले. सध्या बाळाचे वजन 1.4 किलोग्रॅम असून, बाळ पूर्ण दूध पचवू शकत आहे. आई-बाळ दोघेही सुखरूप असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी ’Bharat Live News Media’शी बोलताना सांगितले. त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांचे मार्गदर्शन आणि डॉ. ईशा तिखे यांचे साहाय्य लाभले.
उपचार घेतलेल्या बालकांची आकडेवारी (एप्रिल 23 ते मार्च 24)

उपचार घेतलेली बालके : 1716
कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली बालके : 566
व्हेंटिलेटर/ऑक्सिजनवरील बालके : 221
मृत बालके : 18

हेही वाचा

मतदारसंघातील कामे आणि पाच आमदारांच्या पाठबळावर विजय मिळवू : सुनील तटकरे
कोल्हापूर: आंबा मतदान केंद्रावर निसर्ग पर्यटन जागवणारी थीम
Onion Export News | ७५ रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ