LokSabha Elections : त्यांचे डोके फिरलेय : अजित पवारांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती, भोरमध्ये अजित पवार मित्रमंडळाकडून मतदाराना पैसे वाटप झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यानी केला. अजित पवार यानी त्यांचे डोके फिरलेय या शब्दात प्रत्युतर दिले. अजित पवार म्हणाले, मी सुध्दा त्यानी ही निवडणूक अतिशय चुकीच्या पध्दतीने हाताळल्याचा आरोप करु शकतो. पण मी करणार नाही. ते काहीही आरोप करत सुटले आहेत. जिल्हा बॅंक उघडी असल्याचे कोणी पाहिले का ? तो व्हिडिओ कालचाच आहे का ? त्याची शहानिशा झाली का ? असे सवाल अजित पवार यानी केले. मी सतत सात निवडणूका जिंकल्या आहेत. असले प्रकार करण्याची मला गरज नाही असे अजित पवार म्हणाले.
आई माझ्यासोबत, शरद पवारांना टोला
श्रीनिवास पवार यानी आईला हे राजकारण न आवडल्याने ती पुण्यात राहत असल्याचे सांगितले होता. अजित पवार यानी आई आशाताई पवार यानाच सोबत आणत मतदान करत त्याना उत्तर दिले. आमच्या कुटुंबात माझी आईच सर्वात ज्येष्ठ असल्याचे सांगत शरद पवार याना टोला लगावला.
हेही वाचा
उत्तम झोपेमुळे वय, कार्यक्षमता व प्रसन्नतेत वृद्धी; संशोधनातून निष्कर्ष
Lok Sabha Election 2024 : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क
जप्त राेकड ३५ काेटींवर!, झारखंडचे मंत्री आलम यांच्या पीएसह एकाला अटक