भाजप नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बळवंतराव ढोबळे यांचे सोमवारी (दि.६) रात्री वार्धक्याने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. येत्या २ जुलैला त्यांची शंभरी पूर्ण होणार होती. त्यांच्या मागे ५ मुले, ३ मुली व मोठा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी बिहारमध्ये कार्य केले. पुढे ते भाजपमध्ये सक्रिय झाले. नागपूर … The post  भाजप नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन appeared first on पुढारी.

 भाजप नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बळवंतराव ढोबळे यांचे सोमवारी (दि.६) रात्री वार्धक्याने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. येत्या २ जुलैला त्यांची शंभरी पूर्ण होणार होती. त्यांच्या मागे ५ मुले, ३ मुली व मोठा परिवार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी बिहारमध्ये कार्य केले. पुढे ते भाजपमध्ये सक्रिय झाले. नागपूर महापालिकेत २५ वर्षे ते नगरसेवक होते. १९९० मध्ये ते विधान परिषदेवर पोहचले. महाल परिसरातील नटराज टॉकीज येथील निवास स्थानावरून उद्या मंगळवारी (दि.७) त्यांची अंत्ययात्रा निघणार असून गंगाबाई घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ढोबळे यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 | धुळे लोकसभेच्या निवडणुकीतून चौघांची माघार, किती उरले रिंगणात?
ब्रिजभूषण यांच्या मुलाला तिकीट दिल्याने लोकदल नेत्याचा राजीनामा
जलसंकट! खडकवासला धरणसाखळीत 26 टक्के साठा; पाणीकपातीचे आवाहन

 
Latest Marathi News  भाजप नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.