अहमदाबादमधील ७ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून दिल्ली एनसीआरमधील १०० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता गुजरातमधील अहमदाबादच्या सात शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे मिळाल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली असून अहमदाबाद पोलीस अलर्ट झाली आहे. आज (दि.६)  सकाळी आलेल्या ईमेलमधून ७ शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली …

अहमदाबादमधील ७ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून दिल्ली एनसीआरमधील १०० हून अधिक शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता गुजरातमधील अहमदाबादच्या सात शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे मिळाल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली असून अहमदाबाद पोलीस अलर्ट झाली आहे. आज (दि.६)  सकाळी आलेल्या ईमेलमधून ७ शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या टीमने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. Schools Bomb Threat in Ahmedabad
अहमदाबाद क्राइम ब्रँचचे डीसीपी अजित राजियन म्हणाले की, धमकीचा मेल बाहेरच्या सर्व्हरवरून आला आहे. हा एक बनावट मेल असल्याचे दिसते. त्याचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. भारतामध्ये अशा प्रकारच्या मेलमध्ये छेडछाड केली जात आहे. पोलिसांकडून अशा मेलवर नजर ठेवण्यात येत आहे. Schools Bomb Threat in Ahmedabad
Schools Bomb Threat in Ahmedabad या शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
डीपीएस बोपल
आनंद निकेतन बोपल
एशिया इंग्लिश स्कूल, वस्त्रापूर
कॅलोरेक्स स्कूल, घाटलोडिया
न्यू नोबल स्कूल व्यासवाडी, नरोडा
ओएनजीसी केंद्रीय विद्यालय, चांदखेडा
अमृता विद्यालय, घाटलोडिया
ज्या शाळांना धमक्या आल्या आहेत त्या शाळांची बॉम्ब निकामी पथकांकडून तपासणी केली जात आहे. याशिवाय अहमदाबाद सायबर क्राइम हे मेल कोठून आणि कोणी पाठवले याचाही तपास करत आहे. अहमदाबाद पोलिसांनी जनतेला अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काहीही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवावे.

Gujarat: Three schools in Ahmedabad receive bomb threats through email. Ahmedabad Police is probing the matter. Details awaited.
— ANI (@ANI) May 6, 2024

हेही वाचा 

‘पाकिस्‍तानने बांगड्या घातलेल्‍या नाहीत’ : फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त टिप्पणी
विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकारण तापले!
गडचिरोली : नक्षल्‍यांचा घातपाताचा कट फसला; स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, माईन्स पोलिसांकडून नष्‍ट

Go to Source