अमेठीतील काँग्रेस कार्यालयावर हल्‍ला, वाहनांची तोडफोड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित अमेठीमधील काँग्रेस कार्यालयावर रविवारी ( दि. ५ मे) मध्‍यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्‍ला केला. कार्यालया बाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला. यानंतर हल्‍लेखोर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान, हा भ्‍याड …

अमेठीतील काँग्रेस कार्यालयावर हल्‍ला, वाहनांची तोडफोड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित अमेठीमधील काँग्रेस कार्यालयावर रविवारी ( दि. ५ मे) मध्‍यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्‍ला केला. कार्यालया बाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला. यानंतर हल्‍लेखोर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्‍यान, हा भ्‍याड हल्‍ला भाजपच्‍या गुंडांनी केला असल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस कार्यालयावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला, अज्ञात हल्लेखोरांनी बाहेर पार्क केलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली. त्यांनी गोंधळ निर्माण केला. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत परिस्‍थिती नियंत्रणात आणली. सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्म X वर काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये कारच्या खिडक्या फुटलेल्या आणि काचेचे तुकडे जमिनीवर विखुरलेले दिसत आहेत. अमेठीतील पराभवाच्या भीतीने भाजपने हिंसाचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पराभवाच्‍या भीतीने भाजपकडून हिंसाचार : काँग्रेसचा आराेप
काँग्रेसच्‍या अधिकृत X हँडेलवरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ” लोकसभा निवडणुकीतील पराभव पाहून हताश झालेले भाजपचे गुंड लाठ्या आणि रॉडने सज्ज अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पोहोचले. त्यांनी कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड केली. अमेठीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या वेळी स्थानिक लोकांच्या वाहनांचेही नुकसान झाले, ही घटना अमेठीत भाजपचा पराभव झाल्याचा साक्षीदार आहे.”

यूपी के अमेठी में स्मृति ईरानी और BJP के कार्यकर्ता बुरी तरह डरे हुए हैं।
सामने दिख रही हार से बौखलाए BJP के गुंडे लाठी-डंडों से लैस होकर अमेठी में कांग्रेस कार्यालय के बाहर पहुंचे और वहां खड़ी गाड़ियों में तोड़फोड़ की।
कांग्रेस के कार्यकर्ताओं और अमेठी के लोगों पर भी जानलेवा… pic.twitter.com/Knv7BBN8bk
— Congress (@INCIndia) May 5, 2024

वाहने फोडून प्रश्न सुटणार नाही : काँग्रेस नेत्‍या सुप्रिया श्रीनाटे
काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनीही या घटनेचा निषेध करत भाजपवर गुंडगिरीचा आरोप केला. “अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलीस मूक प्रेक्षक राहिले आणि भाजपचे कार्यकर्ते गुंडगिरी करत राहिले. वारा बदलला आहे, वाहने फोडून प्रश्न सुटणार नाही,”, असे त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये
म्‍हटलं आहे.
रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्‍ये २० मे रोजी मतदान होणार आहे.पीटीआयने दिलेल्‍या वृत्तानुसार, प्रियांका गांधी-वढेरा आजपासून रायबरेली आणि अमेठी दौर्‍यावर आहेत.
हेही वाचा : 

Loksabha Election | सतरा लाख लोक देश सोडून गेले : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
Baramati Lok Sabha Election : बारामतीतील हायप्रोफाईल लढतीकडे सार्‍या देशाचे लक्ष
Lok Sabha election KL Sharma : “मी गांधी घराण्याचा नोकर नाही…”: काँग्रेसचे अमेठीतील उमेदवार शर्मांचे भाजपला प्रत्युत्तर

Go to Source