पैठण येथील पाचोड फाट्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात; वकिलाचा मृत्यू
पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील पाचोड फाट्यावर रविवारी (दि.२६) रात्री ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये पैठण न्यायालयात कार्यरत असलेल्या वकिलाचा मृत्यू झाला. आशिष देविदास निवारे (वय ४५, रा.पैठण) असे मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव आहे.
पैठण शहरालगत असलेल्या पाचोड फाट्यावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमरास पैठण न्यायालयातील वकील आशिष निवारे हे आपल्या दुचाकीवरून पैठणला येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात निवारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवारे यांना तपासून मयत घोषीत केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख, जमादार दिनेश दांडगे यांनी अपघातस्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
हेही वाचा :
Pune : विश्रांतवाडी-विमानतळ रस्त्यावर वाहनचालकांचा जीव मुठीत !
कोल्हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी
Nashik News : नाशिकरोड रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा
The post पैठण येथील पाचोड फाट्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात; वकिलाचा मृत्यू appeared first on पुढारी.
पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील पाचोड फाट्यावर रविवारी (दि.२६) रात्री ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये पैठण न्यायालयात कार्यरत असलेल्या वकिलाचा मृत्यू झाला. आशिष देविदास निवारे (वय ४५, रा.पैठण) असे मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव आहे. पैठण शहरालगत असलेल्या पाचोड फाट्यावर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमरास पैठण न्यायालयातील वकील आशिष निवारे हे आपल्या दुचाकीवरून पैठणला येत …
The post पैठण येथील पाचोड फाट्यावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात; वकिलाचा मृत्यू appeared first on पुढारी.