आता आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओची शिकार, नको त्या..
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झालेल्या दिसतात. (Deepfake Video ) यात रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकर यांची नावे आल्यानंतर आता आलिया भट्टचे नाव देखील जोडले गेले आहे. सध्या डीपफेक व्हिडीओचे संकट निर्माण झाले आहेत. अशातच व्हिडीओ समोर आले आहे. (Deepfake Video )
संबंधित बातम्या-
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३ ची महाविेजेती ठरली गौरी पगारे
Bigg Boss 17 : वीकेंड का वारमध्ये सनी लिओनी! ‘थर्ड पार्टी’चे प्रमोशन
IFFI 2023 : चंदेरी दुनियेचा माहोल क्रिकेटमय, मुरलीधरन रेड कार्पेटवर
आता आलिया डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकली असून तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये एका मुलीच्या व्हिडीओमध्ये आलियाच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. व्हिडिओत आलियाला नको त्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. व्हिडिओ एडिट करून आलियाला नाजूक अवस्थेत दाखवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला. इतकेच नाही तर, दिल्ली पोलिसांना याप्रकरणी पुरावे सापडले असल्याची माहितीही समोर येत आहे. शिवाय गुन्हेगारांना अटक होईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली होती.
The post आता आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओची शिकार, नको त्या.. appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झालेल्या दिसतात. (Deepfake Video ) यात रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकर यांची नावे आल्यानंतर आता आलिया भट्टचे नाव देखील जोडले गेले आहे. सध्या डीपफेक व्हिडीओचे संकट निर्माण झाले आहेत. अशातच व्हिडीओ समोर आले आहे. (Deepfake Video ) संबंधित बातम्या- सा रे …
The post आता आलिया भट्ट डीपफेक व्हिडिओची शिकार, नको त्या.. appeared first on पुढारी.