छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मोठी कारवाई, ४ नक्षलवादी ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. या घटनेची पुष्टी पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF) यांच्या संयुक्त सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. (Chhattisgarh encounter) याबाबतचे वृत्त ANI ने दिले आहे.
“आज सकाळपासून नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले.
“आज सकाळपासून नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे,” असे एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले. “नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत आणि इतर अनेक जखमी झाले आहेत. सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षित आहेत,” असेही अधिकारी पुढे म्हणाले.
यापूर्वी ५ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.