दुर्दैवी ! ट्रकची कारला धडक; तिघे ठार : नवीन कार खरेदी केली म्हणून गेले होते दर्शनाला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवीन कार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोणीकंद-थेऊर रस्त्यावर रविवारी रात्री घडली. गणेश सुखलाल जाधव (वय 35), विनोद तुकाराम भोजणे (वय 36) आणि विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय 36, तिघे रा. एलएनटी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. …

दुर्दैवी ! ट्रकची कारला धडक; तिघे ठार : नवीन कार खरेदी केली म्हणून गेले होते दर्शनाला

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : नवीन कार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोणीकंद-थेऊर रस्त्यावर रविवारी रात्री घडली. गणेश सुखलाल जाधव (वय 35), विनोद तुकाराम भोजणे (वय 36) आणि विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय 36, तिघे रा. एलएनटी फाटा, सणसवाडी, सोलापूर रस्ता) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात हेमंत लखमन दलाई (वय 30, रा. पाबळ चौक, शिक्रापूर, ता. शिरूर) जखमी झाले. ट्रकचालक मच्छिंद्र तुकाराम जाधव (रा. गावठाण, काराठी, ता. बारामती) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
बाळचंद्र शिवाजी पांचाळ (वय 36, रा. बालाजी पार्क, केसनंद रस्ता, वाघोली, मूळ रा. कौठाळा, जि. लातूर) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश जाधव यांनी नवीन कार खरेदी केली होती. त्यानंतर गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमंत हे थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी रविवारी आले होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दर्शन घेऊन ते कारमधून लोणीकंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. जोगेश्वरी मंदिरासमोर भरधाव ट्रकने कारला समोरून धडक दिली. अपघातात गणेश, त्यांचे मित्र विनोद, विठ्ठल, हेमंत जखमी झाले. ट्रकच्या धडकेत कारची पुढील बाजू चेपली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा

आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद; नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस
PM Narendra Modi Sabha : मोदींमुळे पुण्याला मिळाला आधुनिक चेहरा; उपमुख्यमंत्री फडणवीस
अजित पवार हे धमकी बहाद्दर, रोज लोकांना धमक्या देतात : संजय राऊत