राष्ट्रवादीचा मी राजीनामा दिला आहे : एकनाथ खडसे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यास मोकळे असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Eknath Khadse) एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी आज (दि.25) एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेऊन नामनिर्देशन पत्र भरले आहे. मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या …

राष्ट्रवादीचा मी राजीनामा दिला आहे : एकनाथ खडसे

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे मी आता कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यास मोकळे असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Eknath Khadse)
एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी आज (दि.25) एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेऊन नामनिर्देशन पत्र भरले आहे. मी रक्षा खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. मात्र, मी अद्यापही भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. (Eknath Khadse)
दोन्ही उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. अधिकाधिक मताने नेते निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यास मोकळा आहे. असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
हेही वाचा :

Chhagan Bhujbal | मी कुणालाच घाबरत नाही, नाशिकमध्ये अर्ध्याहुन जास्त मराठा मतदार माझ्या बरोबर
400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : अरे भैय्या! हम भी जावत है मतदान खातिर; परप्रांतीय कामगार गावाकडे रवाना