कोंकणा ‘या’अभिनेत्याला करतेय डेट? एक्स पतीच्या एका कॉमेंटमुळे चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अभिनेता अमोल पाराशरला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Konkana Sen Sharma Dating) कारण आहे- तिचा एक्स पती रणवीर शौरीने एक्स अकाऊंटवर केलेले कॉमेंट. कोंकणाचा एक्स पती, अभिनेता रणवीर शौरीने अप्रत्यक्षपणे तिच्या डेटिंगला दुजोरा देत एका ट्विटखाली कॉमेंट केल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. कोंकणा सेन आणि अमोल पराशर …
कोंकणा ‘या’अभिनेत्याला करतेय डेट? एक्स पतीच्या एका कॉमेंटमुळे चर्चेला उधाण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, अभिनेता अमोल पाराशरला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Konkana Sen Sharma Dating) कारण आहे- तिचा एक्स पती रणवीर शौरीने एक्स अकाऊंटवर केलेले कॉमेंट. कोंकणाचा एक्स पती, अभिनेता रणवीर शौरीने अप्रत्यक्षपणे तिच्या डेटिंगला दुजोरा देत एका ट्विटखाली कॉमेंट केल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. कोंकणा सेन आणि अमोल पराशर डेट करत असल्याचे ट्विट पोस्ट झाल्यानंतर त्याखाली रणवीर शौरीने I agree अशी कॉमेंट केलीय. (Konkana Sen Sharma Dating)
याआधी कोकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर गुपचुपपणे एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. एका अकाऊंटवर हे ट्विट असून म्हटले आहे की, ‘..’रणवीर शौरी सोडून…सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पाराशर यांना डेट करण्याचा उत्तम निर्णय घेतला.” 
या ट्विटला रणवीर शौरीने रिट्विट केले, ‘मी याच्याशी सहमत आहे.’ या एका कॉमेंटमुळे कोंकणाची चर्चा होत आहे. अमोल पाराशर आणि कोंकणा सेनने एकत्र ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात काम केले होते.