उन्हाळी हंगामात कोकणातील प्रवाशांना ‘या’ गाड्यांचा होणार फायदा

उन्हाळी हंगामात कोकणातील प्रवाशांना ‘या’ गाड्यांचा होणार फायदा

रोहे; महादेव सरसंबे ; मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ३६ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि थिविदरम्यान ३६ त्रिसाप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्यांचा कोकणवासीयांना फायदा होणार आहे. यासह लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि दानापुरदरम्यान २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या 

नाशिक सोडून जाण्याचा प्रश्नच नाही! अमोल कोल्हे यांच्या गौप्यस्फोटानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या ‘वुमन ऑफ माय बिलियन’ची तारीख समोर
‘ज्ञानवापी’ सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्‍याची धमकी

अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-थिवि-लोकमान्य टिळक टर्मिनस त्रि-साप्ताहिक वातानुकूलित विशेष (३६ फेऱ्या) गाडी क्रमांक ०१०१७, वातानुकूलित विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दि. २६.०४.२०२४ ते ०४.०६.२०२४ पर्यंत दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी २२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता थिवि येथे पोहोचेल. (१८ फेऱ्या) गाडी क्रमांक ०१०१८ वातानुकूलित विशेष थिवि येथून दि. २७.०४.२०२४ ते दि. ०५.०६.२०२४ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १६.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (१८ फेऱ्या) या गाडीसाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड आदी थांबे देण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापुर विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रमांक ०१०११ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून शुक्रवार, दि. २६.०४.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.०० वाजता दानापुर येथे पोहोचेल.
विशेष दानापुर येथून शनिवारी, दि. २७.०४.२०२४ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जं. आदी थांबे देण्यात आले आहेत
तिकीट बुकिंगसाठी जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रांना किंवा www.irctc.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.