रसिख दारला ‘आक्रमक सेलिब्रेशन’ करणं पडलं महागात, BCCIची मोठी कारवाई
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज रसिख सलाम दार याला मैदानावरील गैरवर्तन महागात पडले आहे. त्याने बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात असे काही कृत्य केले, ज्याबद्दल त्याला बीसीसीआयने फटकारले आणि दंडही ठोठावला आहे.
आयपीएल २०२४ मधील ४०वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीत पार पडला. हा सामना दिल्लीने अवघ्या ४ धावांनी जिंकला. डीसीच्या या निसटत्या विजयात गोलंदाज रसिख सलाम दारने ४४ धावांत ३ विकेट्स घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने गुजरात टायटन्सचे फलंदाज साई सुदर्शन (६५), शाहरुख खान (८) आणि आर साई किशोर (१३) यांना बाद केले होते. (IPL 2024)
पण या विकेट्स घेतल्यानंतर केलेले आक्रमक सेलिब्रेशन त्याला महागात पडले आहे. तो आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ च्या लेव्हल वन गुन्ह्यासाठी दोषी आढळला आहे. हा नियम दुसऱ्या खेळाडूला चिथावणी देणारी भाषा किंवा कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे. रखीम सलाम दारने हा गुन्हा कबूल केला असून मॅच रेफरीचा निर्णय स्वीकारला आहे.