धक्‍कादायक..! गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्‍याने कराचीत ‘एसपी’च्‍या मुलाने केली मित्राची हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील कराचीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी मागवलेला बर्गर खाणार्‍या मित्राची हत्या केली आहे, असे वृत्त पाकिस्‍तानमधील ‘एआरवाय न्यूज’ने वृत्त दिले आहे. कराचीमधी डिफेन्‍स परिसरात ८ फेब्रुवारी रोजी घडलेल्‍या या घटनेचा पोलिस तपासात धक्‍कादायक माहिती समोर आली. विशेष म्‍हणजे या प्रकरणातील आरोपी हा पोलीस अधीक्षकांचा मुलगा …
धक्‍कादायक..! गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्‍याने कराचीत ‘एसपी’च्‍या मुलाने केली मित्राची हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील कराचीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी मागवलेला बर्गर खाणार्‍या मित्राची हत्या केली आहे, असे वृत्त पाकिस्‍तानमधील ‘एआरवाय न्यूज’ने वृत्त दिले आहे. कराचीमधी डिफेन्‍स परिसरात ८ फेब्रुवारी रोजी घडलेल्‍या या घटनेचा पोलिस तपासात धक्‍कादायक माहिती समोर आली. विशेष म्‍हणजे या प्रकरणातील आरोपी हा पोलीस अधीक्षकांचा मुलगा आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्‍या तपास अहवालानुसार, सत्र न्यायाधीशाचा मुलगा अली केरियो हा मित्र दानियाल नजीर याच्‍याकडे गेला होता. दानियाल नजीर हा वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नजीर अहमद मीरबहार यांचा मुलगा आहे. केरियो घरी आला त्‍याचवेळी दानियालने आपली गर्लफ्रेंड शाझिया हिला घरी बोलावले होते. यावेळी आरोपीने स्वतःसाठी आणि शाझियाला एन्जॉय करण्यासाठी दोन बर्गर मागवले. किरिओने एका बर्गरचा एक तुकडा खाल्‍ला. संतत्‍प झालेल्‍या दानियाल आणि किरोओची झटापट झाली. येथे उपस्‍थित गार्डची रायफलने डॅनियलने किरिओवर गोळीबार केला, गंभीर जखमी झालेल्‍या किरिओचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.या प्रकरणाचा सखोल तपासात पोलीस अध्‍क्षकांचा मुलगाच खुनी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.
तपास अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करून पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला गुन्ह्यासाठी जबाबदार धरून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला. दानियाल नजीरला सध्या ताब्यात घेण्यात आले आहे.या वर्षी कराचीमध्ये दरोडा-संबंधित मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, एकूण 56, आतापर्यंत 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्या तुलनेत, मागील वर्षी याच कालावधीत दरोड्यांविरुद्ध प्रतिकार केल्यामुळे 25 मृत्यू आणि 110 जखमी झाले होते.

Karachi boy kills friend for ‘eating’ his girlfriend’s burger#ARYNews #Burgerhttps://t.co/mixB8KyjHj
— ARY NEWS (@ARYNEWSOFFICIAL) April 24, 2024