Loksabha election 2024 : ‘वंचित’कडून वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यापूर्वी जंगी मिरवणूक, पदयात्रा काढत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी बड्या नेत्यांच्या उपस्थितीत सभा घेत, शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांनी देखील बुधवारी अर्ज भरला. त्यांनी अरोरा टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज भरला. प्रदेश प्रवक्ते अॅड. प्रियदर्शी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, पुणे शहर महासचिव सुनील धेंडे, पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी, महिला शहराध्यक्षा अंजली चव्हाण, शहर प्रवक्ते गौरव जाधव, नितीन जगताप यांच्यासह ज्येष्ठ नेते वसंत साळवे उपस्थित होते.
हेही वाचा
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांची निवड
कोल्हापूर : गडहिंग्लजला उद्यापासून हेल्मेट सक्ती
काँग्रेसचा जाहीरनामा राष्ट्रविघातक: माधव भंडारी यांचा गंभीर आरोप