प्रवक्त्या आडून वारसा न सांगता समोर येऊन बोला; खा. मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांची कामे आणि त्यांचा वारसा याबाबत बोलण्यापेक्षा आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय पावले उचलली, याचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली आहे. यामुळे सातत्याने प्रवक्त्या आडून वारसा न सांगता समोर या. जाहीरपणे कोल्हापूरचा विकास यावर थेट चर्चा करू, अशा शब्दांत खासदार संजय मंडलिक यांनी शाहू …

प्रवक्त्या आडून वारसा न सांगता समोर येऊन बोला; खा. मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांची कामे आणि त्यांचा वारसा याबाबत बोलण्यापेक्षा आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय पावले उचलली, याचा लेखाजोखा मांडण्याची वेळ आली आहे. यामुळे सातत्याने प्रवक्त्या आडून वारसा न सांगता समोर या. जाहीरपणे कोल्हापूरचा विकास यावर थेट चर्चा करू, अशा शब्दांत खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांना चर्चेचे निमंत्रण दिले.
गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे. पण, उमेदवारांनी गादीचा लौकिक वाढावा, राजर्षींचा कृतिशील वारसा जपावा, यासाठी काय केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शनिवारी (दि. 27) पंतप्रधान मोदी यांची कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. महायुतीच्या पदाधिकार्‍यांची या सभेच्या तयारीची बैठक झाली. बैठकीनंतर खा. मंडलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राजर्षी शाहूंचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायला आम्ही कटिबद्ध आणि समर्थ आहोत. राजर्षी शाहूं ही आमचीही अस्मिता आहे. ती आम्ही जपूच. अस्मिता जपताना कर्तव्यात कसूर होणार नाही याचं भानही प्रतिस्पर्धी उमेदवारानं राखलं पाहिजे; पण नुसत्याच वारसा हक्कावर दावा केला जात आहे. आपल्या 50 वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला जात नाही. कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले हे निवडणुकीच्या निमित्ताने विचारण्याची वेळ आली आहे. गेल्या 50 वर्षांत विविध क्षेत्रांत काय केले आणि खासदार म्हणून आपण केलेले काम याबाबत खुली चर्चा करूया.
प्रवक्त्यांपेक्षा उमेदवारानं बोलावं; हुकूमशाही थाटाचे वर्तन!
उमेदवाराने आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये. निवडणुकांचा प्रचंड अनुभव असणार्‍या त्यांच्या प्रवक्त्यांनी बोलण्यापेक्षा स्वतः उमेदवाराने आखलेल्या भविष्यातल्या विकास योजनांबाबत बोलावे. प्रवक्त्यांचा निवडणुकीतील उत्साह पाहता शाहू महाराज यांच्यावर उमेदवारी लादली गेल्याचे स्पष्ट होते. आपण सांगू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागावे, अशा हुकूमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत, असे सांगत मंडलिक यांनी नाव न घेता आ. सतेज पाटील यांच्यावर टीका
केली.