भारतात वारसा कर लावला गेला पाहिजे; सॅम पित्रोदा यांच्या भूमिकेमुळे नवा वाद

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची अर्धी संपत्ती जनतेच्या सुपूर्द केली जाते. भारतातही अशाप्रकारे वारसा कर लागू व्हायला हवा, असा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा आग्रह आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतात वारसा कर लागू करण्यावर चर्चा तरी सुरू व्हायलाच हवी, असेही पित्रोदा यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत …

भारतात वारसा कर लावला गेला पाहिजे; सॅम पित्रोदा यांच्या भूमिकेमुळे नवा वाद

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची अर्धी संपत्ती जनतेच्या सुपूर्द केली जाते. भारतातही अशाप्रकारे वारसा कर लागू व्हायला हवा, असा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा आग्रह आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भारतात वारसा कर लागू करण्यावर चर्चा तरी सुरू व्हायलाच हवी, असेही पित्रोदा यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे दहा कोटी डॉलर मालमत्ता असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची 45 टक्के संपत्ती मुलांकडे, तर 55 टक्के मालमत्ता सरकारकडे जाते, असेही पित्रोदा यांनी नमूद केले. भारतातही असा कायदा हवा. भारतात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती त्याच्या मुला-मुलींना मिळते. तसे घडायला नको.
पित्रोदांचे वैयक्तिक मत
सॅम पित्रोदा यांचे हे वैयक्तिक मते आहेे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यावर दिली आहे.